https://youtube.com/shorts/DdOCM6pimrg?si=vcd9kh_C24-9emxe
कविता
जिद्द !!! ---------------------- हरेल, मरेल, खचेल, तुटेल, याची करत नाही पर्वा ती। नेहमीच मुक्त विहरत सळसळत तीला जिंकण्याची जिद्द।। ऊन, वारा, पाऊस, वादळे, यांना भिक घालत नाही ती। प्रयत्नांच्या पराकाष्टेसह मेहनतीने तीला जिंकण्याची जिद्द।। विरोध, अटकाव, निंदानालस्ती, याने कधीच रडत नाही ती। आत्मविश्वासाच्या उडीसह महत्वाकांक्षेने तीला जिंकण्याची जिद्द।। बल, योग, ज्ञान, सावधता, यांनी कधीच विसरत नाही ती। चालाक, चाणाक्ष, चतुर ती खात्रीने तीला जिंकण्याची जिद्द।। केली कोणी सोबत वा नाही केली, मार्गक्रमण कधीच थांबवत नाही ती। क्षणक्षण कृतीने सरकत राहणे कासवावाणी तीला जिंकण्याची जिद्द।। -किर्तीसंध्या ✍️ Email- kirtisandhyapagare@gmail.com
Comments